Pune : गणेशखिंड रस्त्यावर मोटारीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:57 IST2024-01-17T09:56:59+5:302024-01-17T09:57:33+5:30

ही घटना गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ घडली...

Bike rider dies after hitting a car on Ganeshkhind road pune latest crime | Pune : गणेशखिंड रस्त्यावर मोटारीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Pune : गणेशखिंड रस्त्यावर मोटारीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : मोटारीवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ घडली. अमर पंडित सावंत (वय २८, बेलठिकानगर, थेरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मल्लेशप्पा भगवती (५६, रा. मयूरनगरी, पिंपळे गुरव) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार सावंत १३ जानेवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास गणेशखिंड रस्त्याने निघाला होता. मोदीबागेसमोरील उड्डाणपुलाजवळ भरधाव जाणाऱ्या सावंत याने पाठीमागून मोटारीला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झालेल्या सावंतचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.

Web Title: Bike rider dies after hitting a car on Ganeshkhind road pune latest crime