शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:53 IST

खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदीबागेत दाखल झाल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Sunetra Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज आणखी एका भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचा ताफा आज पुण्यातील मोदीबागेतून बाहेर पडताना आढळून आला. याच मोदीबागेत शरद पवार यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याने या लढतीची राज्यभर मोठी चर्चा झाली. निवडणूक प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने पराभव करत गड राखला. या पराभवानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि सुनेत्रा पवार या बिनविरोध खासदार झाल्या. खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, या भेटीबाबत अद्याप सुनेत्रा पवार किंवा शरद पवार यांच्या गोटातून अधिकृतरीत्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसभेतील पराभव आणि राज्यसभेची संधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांनाविजयी केले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सस्पेन्स होता. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले आणि सुनेत्रा यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला.

 

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस