चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:54 IST2021-02-12T16:52:32+5:302021-02-12T16:54:57+5:30
हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती...

चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत
बारामती: महानायक अमिताभ बच्चन शुक्रवारी (दि. १२ ) अभिनेता अजय देवगण यांच्यासह बारामतीला भेट दिली.यावेळी बारामती येथील विमानतळावर बच्चन आणि देवगण यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचे काही चित्रीकरण पार पडल्याची माहिती मिळत आहे .त्यासाठी हे दोघे उपस्थित होते.
महानायक बच्चन आणि अभिनेता देवगण यांचा चित्रीकरणासाठीचा दौरा गोपनीय असल्याचे सुत्रांनी सांगितले. या दोघांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,उद्योजक रणजित पवार,त्यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी स्वागत केले. यावेळी सुनेत्रा पवार यांनी बच्चन आणि देवगण यांच्याशी संवाद साधला. दरम्यान,येथील विमानतळावर दुपारी दोन वाजेपर्यंत बच्चन आणि देवगण उपस्थित होते.त्यानंतर ते दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
बारामती येथील विमानतळावर २००४ च्या दरम्यान, यापूर्वी देखील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा,अक्षय कुमार यांच्या चित्रटाचे चित्रीकरण पार पडले आहे. मात्र, आजच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती.त्यामुळे बच्चन आणि देवगण यांच्या विमानतळावरील उपस्थितीबाबत बारामतीकर अनभिज्ञ होते. सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे दोन्ही अभिनेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत बारामतीकरांना माहिती मिळाली.