मोठी कारवाई! रक्त चंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना अटक; ३२ लाखांचा माल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:07 PM2021-06-09T22:07:35+5:302021-06-09T22:07:52+5:30

खंडणी विरोधी पथकाची कारवाई; २७ लाखांचे २७० किलो रक्तचंदन जप्त

Big Action : Three arrested for smuggling sandalwood; 32 lakh worth of goods seized | मोठी कारवाई! रक्त चंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना अटक; ३२ लाखांचा माल हस्तगत

मोठी कारवाई! रक्त चंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना अटक; ३२ लाखांचा माल हस्तगत

Next

पुणे : रक्त चंदनाची तस्करी करुन टेम्पोतून २७० किलो रक्तचंदन घेऊन जाणार्‍यांना खंडणी विरोधी पथकाने पकडले. विकी संजय साबळे (वय १९, रा. मांजरी, हडपसर), रोहित रवी रुद्राप (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि अ‍ॅलेन कन्हैय्या वाघमारे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

खंडणीविरोधी पथक २ चे अधिकारी अवैध कारवायांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार भूषण शेलार व अमोल पिलाणे यांना याबाबत माहिती मिळाली होती. कोंढवा परिसरातून एक टेम्पो लोणी काळभोर परिसरात विक्रीसाठी येणार होता. लोणी काळभोर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. यावेळी संशयित टेम्पोची तपासणी केल्यावर त्याला २७ लाख रुपयांचा २७० किलो रक्तचंदनाचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा व टेम्पो असा ३२ लाखांचा माल जप्त केला. विकी साबळे व रोहीत रुद्राप यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते हे रक्तचंदन विक्रीसाठी अ‍ॅलेन वाघमारे याला देणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. वन परिमंडळाचे अधिकारी मंगेश सपकाळे व वनरक्षक मनोज पारखे यांनी रक्तचंदनाची पडताळणी करुन पोलिसांना तपासात मदत केली.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Big Action : Three arrested for smuggling sandalwood; 32 lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.