NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:04 PM2023-11-02T20:04:16+5:302023-11-02T20:05:12+5:30

आरोपी हा दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे....

Big action of NIA! Eighth suspect arrested in ISIS MODULE case from Pune | NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक

NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक

पुणे : पुणे ISIS मॉड्युलच्या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून देशभर कारवाई सुरू आहे. अशीच एक कारवाई पुण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणातील आठवी अटक पुण्यातून केली आहे. आरोपी हा दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. 

एनआयएने केलेल्या कारवाईत मोहम्मद शाहनवाज आलमला अटक केली आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता. तपासात समोर आले आहे की, शाहनवाझने गुप्तहेर म्हणून वापरण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणे शोधण्यात तसेच गोळीबाराचे वर्ग आयोजित करण्यात आणि सुधारित स्फोटक उपकरणे (IED) सराव तयार करण्याचे प्रशिक्षण यामध्ये सक्रिय भूमिका बजावली होती.

ISIS पुणे मोड्यूल प्रकरणाच्या NIA द्वारे केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती.

भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए तपास करत आहे.

Web Title: Big action of NIA! Eighth suspect arrested in ISIS MODULE case from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.