शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयामुळे सापडली दुचाकी

By admin | Updated: August 2, 2014 04:15 IST

काही चांगले काही वाईट परिणामांची तुलना करता मोबाइलच्या व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो

काळेवाडी : काही चांगले काही वाईट परिणामांची तुलना करता मोबाइलच्या व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो. याचा प्रत्यक्ष अनुभव काळेवाडीतील उत्तम लोंढे यांना आला.येथील तापकीरनगरमधील लोंढे यांची हिरोहोंडा कंपनीची सीबीझेड दुचाकी (एमएच-१४ बीझेड ५२०१) मागील आठ दिवसांपूर्वी रहाटणी फाट्यावरील गवळी मार्केट येथील दुकानासमोरुन चोरीस गेली होती. गाडी चोरीस गेल्यानंतर त्यांनी याची खबर काळेवाडी पोलीस चौकीत देऊन त्या गाडीचा फोटो आपल्या मोबाइलवरील व्हॉटस्अ‍ॅप द्वारे सर्व मित्रांना पाठवून गाडी चोरीस गेल्याचे कळवले. तसेच चोरीस गेलेल्या गाडीचा तपास व्हावा या दृष्टीने वारंवार पोलीस चौकीत जाऊनही विचारणा केली. परंतु गाडीचा तपास लागत नव्हता. आठ दिवसांपासून ते हरवलेल्या गाडीचा शोध घेत होते. व्हॉट्सअ‍ॅपवर टाकलेल्या गाडीचा फोटो व नंबरमुळे त्यांना त्यांची गाडी एक आठवड्यानंतर वाकडमधील कस्पटे वस्तीजवळील एका हॉटेलजवळ पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा असाही चांगला वापर होऊ शकतो याचा प्रत्यय लोंढे यांना आला. तत्काळ त्यांनी याची खबर पोलिसांना देऊन आपली हरवलेली गाडी ते घरी घेऊन आले. (वार्ताहर)