शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नदी प्रदुषणाविरोधात भूमाता संस्था करणार जागर : कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:30 IST

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीपासून ४ जानेवारीला या मोहिमेची सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देखासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवातसरकारला देखील प्रदुषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येणार

पुणे : राज्यातील सर्वच प्रमुख नद्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. लोकचळवळीच्या माध्यमातून या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी भूमाता संस्थेच्या वतीने प्रदुषणमुक्त नद्यांचा जागर ही मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीपासून ४ जानेवारीला या मोहीमेची सुरुवात होणार असून, पुढील टप्प्यात सातारा आणि पुण्यातील नदी प्रदुषणाबाबत जागर केला जाणार असल्याची माहिती भूमाता संघटनेचे संस्थापक कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. रमेश आवटी, कमल सावंत यावेळी उपस्थित होते. पंचगंगा नदीचे संगमापासून (कुरुंदवाड) त उगमापर्यंत (प्रयाग, चिखली, कोल्हापूर) ४ ते ७ जानेवारी दरम्यान जागर यात्रा काढण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात होईल. मुळीक म्हणाले, पंचगंगेच्या प्रदुषणाची सुरुवात संगमापासून होते. त्यानंतर कोल्हापूर शहरातून इचलकरंजी जवळ वीर संताजी घोरपडे समाधी जवळ ही नदी कृष्णेला मिळते. तेथे पंचगंगेला गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरातील मैलापाणी, वस्त्रोद्योगातील रसायनमिश्रित पाणी, शेतीत वापरलेल्या रासायनिक खतांमुळे होणारे प्रदुषण यावर जागर मोहीमेत भर देण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यत दुषित पाण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर केल्याने कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे साडेसोळा हजार रुग्ण येथे कॅन्सरशी झुंज देत आहेत. राज्यातील सर्वच शहरातून जाणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाल्याचे दिसून येते. तेच पाणी पुढे वाहत जाते. त्यावरच शेती, गुरांसाठी आणि पिण्याचे पाणी म्हणून वापर होतो. नद्यांच्या प्रदुषणांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. लोकसहभाग वाढविण्याबरोबरच सरकारला देखील प्रदुषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेची उभारणी करणे, प्रदुषण नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून देखरेख करणे, औद्योगिक प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे अशा विविध पातळ््यांवर काम करण्यात येणार आहे. कृष्णा खोऱ्या पाठोपाठ भीमा खोऱ्यातील मुळा-मुठा, नीरा, इंद्रायणी या नद्यांच्या परिसरातही अशीच जागर मोहीम काढण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरriverनदीpollutionप्रदूषण