भुजबळ ‘राष्ट्रवादी’तच; पक्षांतराच्या चर्चेवर पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 05:49 IST2019-09-07T05:49:52+5:302019-09-07T05:49:57+5:30
काही दिवसांपूर्वी भुजबळ ‘शिवबंधन’ हातात बांधणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात होते.

भुजबळ ‘राष्ट्रवादी’तच; पक्षांतराच्या चर्चेवर पडदा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली असताना शुक्रवारी मात्र भुजबळ यांनी पुण्यात बारामती होस्टेल येथे झालेल्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित राहिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर पडदा पडल्याचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भुजबळ ‘शिवबंधन’ हातात बांधणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात होते. शुक्रवारी भुजबळ यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. दुपारी अडीचच्या सुमारास बैठक सुरू झाली. तत्पूर्वी भुजबळ सर्वात आधी गाडीतून एकटेच बैठकीच्या ठिकाणी आले. संपूर्ण बैठकीत भुजबळ यांनी उपस्थित राहून जागा वाटपाच्या चर्चेत सहभाग घेतला.