शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:46 IST

मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना केलेला विरोध त्यांना भोवला असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या युती संदर्भात दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची आज होणार आहे. त्यावर जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने पक्षाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे तर भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना निमंत्रित केले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटीलांवरकेलेली सततची टीका त्यांना भोवली असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

रवींद्र धंगेकर यांनी मध्यंतरी पुण्याची गुन्हेगारी कमी करण्याचा विडाच उचलला होता. निलेश घायवळ प्रकरणावरून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी महायुतीतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही माझ्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आता महायुतीतीलच नेत्यांना विरोध करणे त्यांना चांगलेच भोवले आहे.      

पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या २३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर भाजप, रिपाइं आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी होणार की नाही यावर खल सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये मनेसचा समावेश होणार की मनसे स्वतंत्र लढणार या बाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीसाठी आपने २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारी यादी जाहीर करण्यात आपने आघाडी घेतली आहे. भाजपने २ हजार ५०० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवारी यादीतील नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या युती संदर्भात दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition costs leader; Dhangkar uninvited from Mahayuti meeting.

Web Summary : Ravindra Dhangkar faced consequences for opposing Mahayuti leaders. He criticized Patil and Mohol, leading to his exclusion from a key meeting regarding Pune Municipal Corporation elections. BJP, Shinde Sena, and allies discuss seat sharing, while MVA and MNS decisions remain pending.
टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळchandrahar patilचंद्रहार पाटीलPoliticsराजकारणMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६