भीमाशंकर कारखान्यास देशातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:04+5:302021-02-05T05:08:04+5:30

राज्यातील २०१९-२० च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी ...

Bhimashankar factory awarded 'Best Cooperative Sugar Factory Award' in the country | भीमाशंकर कारखान्यास देशातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’

भीमाशंकर कारखान्यास देशातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’

राज्यातील २०१९-२० च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

बेंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेले ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

--

कोट

यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १० व राज्य पातळीवरील १२ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे.

- बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना

Web Title: Bhimashankar factory awarded 'Best Cooperative Sugar Factory Award' in the country