Bhima Koregaon| पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी केला बसने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 18:59 IST2022-01-01T18:41:57+5:302022-01-01T18:59:25+5:30
कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०२२ रोजीच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने तब्बल दोनशे साठ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत

Bhima Koregaon| पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी केला बसने प्रवास
कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीनंतर प्रशासन विशेष खबरदारी घेतल्याचे दिसले. येणा-या समाज बांधवांची वाहने शिक्रापूर व लोणीकंद येथे पार्किंग करत प्रशासनाच्या वतीने उपलब्ध केलेल्या बस मधून नागरिकांना ने-आन केले जात असते. कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०२२ रोजीच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने तब्बल दोनशे साठ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
सदर बस मधून नागरिकांना योग्य सेवा दिली जाते का, हे पाहण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वत: बस मधून प्रवास केला. त्यावेळी त्यांनी बसेसच्या सुविधांची तपासणी केली आहे.