Bhima Koregaon : ऐतिहासिक विजयस्तंभास आकर्षक सजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 20:25 IST2024-12-31T20:24:26+5:302024-12-31T20:25:24+5:30

कोरेगाव भीमा : येथे एक जानेवारी २०७व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रशासनाकडून नियोजनाची तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी ...

Bhima Koregaon Fascinating decoration of the historic Vijayastambha | Bhima Koregaon : ऐतिहासिक विजयस्तंभास आकर्षक सजावट

Bhima Koregaon : ऐतिहासिक विजयस्तंभास आकर्षक सजावट

कोरेगाव भीमा : येथे एक जानेवारी २०७व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रशासनाकडून नियोजनाची तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली असून त्यासाठी ७० हजार कृत्रिम व १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास एक जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमादरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. येथे तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असलेला ७५ फुटी ऐतिहासिक विजय रणस्तंभ सजावटीची तयारी झाली असून पाण्याच्या साहाय्याने स्तंभ धुवून स्वच्छ करत सजावटीच्या तयारीस सुरुवात करण्यात आली होती.

यावर्षी कृत्रिम व खऱ्या फुलांनी सजविण्यात आला असून स्तंभावर फुलांनी अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व संविधानाचे तैलचित्र लक्ष वेधून घेत होते. तसेच २०७ वा शौर्यदिन असे अक्षर काढत मध्यभागी महार रेजिमेंटचे सिम्बॉल लावण्यात आला असून बाबासाहेबांनी याठिकाणी १९२७ साली उपस्थित राहिल्याचा फोटोही लावण्यात आला होता, तर स्तंभाची फुलांची सजावट पूर्ण होताच स्तंभाला काही प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या सजावटीसाठी बार्टीचे संचालक, निबंधक तसेच जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात आली असल्याचे कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विवेक बनसोडे, सचितानंद कडलक, युवराज बनसोडे यांनी सांगितले.

Web Title: Bhima Koregaon Fascinating decoration of the historic Vijayastambha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.