भारती विद्यापीठ ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 13:45 IST2020-12-03T13:45:34+5:302020-12-03T13:45:59+5:30
शिंदे यांच्या अकाली मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त

भारती विद्यापीठ ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांचे निधन
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल संभाजी शिंदे ( वय ५७ ) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी (दि.३) मध्यरात्री निधन झाले.
अनिल शिंदे हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनअंतर्गत दत्तनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी ते रात्रपाळीला ड्युटीवर असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनिल शिंदे हे शांत, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.