काढा करून दिला नाही म्हणून बायकोचा दाबला गळा, हातही केला फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 13:26 IST2023-11-20T13:24:49+5:302023-11-20T13:26:21+5:30

पोलिसांनी ३९ वर्षीय पतीला अटक केली आहे....

Because it was not removed, his throat was pressed, his wife's hand was fractured | काढा करून दिला नाही म्हणून बायकोचा दाबला गळा, हातही केला फ्रॅक्चर

काढा करून दिला नाही म्हणून बायकोचा दाबला गळा, हातही केला फ्रॅक्चर

पिंपरी : पतीने काढा करून देण्यास सांगितले मात्र, पत्नीने तो करून दिला नाही. याचा राग आल्याने पतीने पत्नीला काठीने मारहाण करत गळा दाबला. पतीच्या मारहाणीत पत्नीचा हात फॅक्चर झाला. ही घटना २७ ऑक्टोबरला मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे घडली. या प्रकरणी पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १८) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३९ वर्षीय पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या घरी असताना पतीने त्यांना काढा तयार करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी काढा करून दिला नाही म्हणून पतीला राग आला. या रागातून त्याने पत्नीस शिवीगाळ करत लाकडी काठीने हातावर, पायावर, पाठीवर, डोक्यावर मारून गळा दाबला. पतीने मारलेली काठी मनगटाला लागून त्या गंभीर जखमी झाल्या.

Web Title: Because it was not removed, his throat was pressed, his wife's hand was fractured