शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

स्वराज्याच्या प्रवेशद्वाराने वाढली सिंहगडाची शोभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:20 AM

गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे दरवाजाच्या कमानीला सागवानी दार बसविण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानकडून सुरु होते.

ठळक मुद्देदाराची उंची साधारण सात फूट असून, पाच फूट लांबराज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि डेरा ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर दुर्गार्पण

पुणे : छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा कोंढाणा अर्थात किल्ले सिंहगडाची शोभा आणि सुरक्षितता आता आणखी वाढली आहे. निमित्त आहे ते सिंहगडामध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या पुणे दरवाजाच्या कमानीला लावण्यात आलेल्या सागवानी भव्य दारामुळे.सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडावरील पुणे दरवाजाला सागवानी दार बसविण्यात आले. त्याचा दुर्गार्पणाचा सोहळा रविवारी सकाळी गडावर रंगला. द्वाराच्या दुर्गार्पणाच्या सोहळ्याला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेते अजय तापकिरे, आनंद काळे आणि  पल्लवी वैद्य उपस्थित होेते.गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे दरवाजाच्या कमानीला सागवानी दार बसविण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानकडून सुरु होते. राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि डेरा ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर रविवारी दार बसवून त्याचे दुर्गार्पण करण्यात आले. या दाराची उंची साधारण सात फूट असून, पाच फूट लांब आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकृत कंत्राटदाराकडून हा सागवानी दरवाजा तयार करण्यात आला असून, त्याला समोरच्या बाजूला मोठे खिळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या दाराला इतिहासकालीन रूप आले आहे. दुर्गार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गडाला विविध फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त नाशिक, धायरी आणि वारजे येथील तीन ढोलपथक आले होते. तर मुंबईहून खास मावळ्यांच्या वेशभूषेतील तुतारीवादक आले होते. तुतारीचा निनाद केल्यावर हे सागवानी दार उघडण्यात आले आणि गडाच्या आतून छत्रपतींच्या वेशभूषेतील पाहुणे पायऱ्या उतरून खाली आले. या वेळी उपस्थितांनी भंडारा उधळून ऐतिहासिक पद्धतीने गडाचे दुर्गार्पण केले.या वेळी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने,  कुणाल साठे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सुशांत मोकाशी, रोहित मते, पांडुरंग मते, अक्षय उंडरे, नागेश जाधव, सिद्धेश कानडे, सरपंच रेखा खाटपे, अमोल पढेर आदी उपस्थित होते. .............गडावर मोफत प्रवेश...एरवी वाहनाने गडावर जाण्यासाठी वन विभागाकडून कर आकारला जातो. मात्र आज कार्यक्रमानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांना गडावर मोफत प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे वन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या जागोजागी असलेल्या बंदोबस्तामुळे पायथ्यापासून गडापर्यंत एकाही ठिकाणी वाहतूककोंडी झाली नाही. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दीड हजार गडप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज