‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:16 IST2026-02-07T16:16:22+5:302026-02-07T16:16:56+5:30

स्पर्धा संपल्यानंतर या कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Beautification just for 'Pune Grand Tour'; Ornamental trees in Baner withered due to lack of maintenance | ‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली 

‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली 

बाणेर : जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक दर्जाच्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने विद्यापीठ चौक ते पाषाण-सूस रस्त्यापर्यंतच्या मार्गावर विकासकामांना मोठी गती दिली होती. स्पर्धेच्या मार्गावर डांबरीकरण, रस्त्यांचे सुशोभीकरण, झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच खड्डेमुक्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात आली होती. महामार्गालगत लावण्यात आलेली शोभेची झाडे देखभालीअभावी आता सुकू लागली आहेत. स्पर्धा संपल्यानंतर या कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

‘ग्रँड टूर’च्या निमित्ताने बाणेर परिसरातील महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर शोभेची झाडे लावण्यात आली होती. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर या झाडांची कोणतीही देखभाल न झाल्याने लाखो रुपयांचा निधी खर्च करून लावलेली ही झाडे सुकून गेली आहेत. झाडे जगवण्यासाठी आवश्यक असलेला नियमित पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन आणि देखरेख न केल्यामुळे अनेक शोभेची झाडे कोमेजली असून काही ठिकाणी पूर्णतः सुकली आहेत. बाणेरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरात हरित क्षेत्र जपणे अत्यंत आवश्यक असताना, केवळ कार्यक्रमापुरते रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडे लावून त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होणे चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेने लाखो रुपये खर्च केले असताना योग्य नियोजन आणि देखभाल न केल्यामुळे हा खर्च वाया गेला असल्याचा आरोपही होत आहे. झाडे लावणे स्वागतार्ह आहे, मात्र त्यांचे संवर्धन आणि जतन करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. सुशोभीकरणाचे उपक्रम सांभाळता येत नसतील, तर केवळ दिखाऊपणासाठी लाखो रुपये खर्च करून, असे उपक्रम राबवू नयेत, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुणे महापालिकेने तातडीने दखल घेऊन उर्वरित झाडांची योग्य देखभाल करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

Web Title : पुणे ग्रैंड टूर सजावट फीकी; बानेर के सजावटी पौधे मुरझाए

Web Summary : पुणे ग्रैंड टूर के लिए बानेर में की गई सजावट उपेक्षित। कार्यक्रम के लिए लगाए गए सजावटी पौधे देखभाल के अभाव में मुरझा रहे हैं। निवासियों ने बर्बाद धन पर निराशा व्यक्त की और नगरपालिका से तत्काल कार्रवाई की मांग की।

Web Title : Pune Grand Tour Beautification Fades; Baner's Ornamental Plants Wither

Web Summary : Beautification for Pune's Grand Tour neglected in Baner. Ornamental plants, planted for the event, are withering due to lack of upkeep. Residents express disappointment over wasted funds and demand immediate action from the municipality.