तृतीयपंथीकडून एका महिलेला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचेही कपडे फाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:24 IST2021-07-04T15:24:07+5:302021-07-04T15:24:15+5:30
पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना, लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

तृतीयपंथीकडून एका महिलेला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचेही कपडे फाडले
पुणे: उत्तमनगर परिसरात एका तृतीयपंथीने महिलेला मारहाण करुन त्यांच्याकडील रक्कम हिसकाविली. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाया महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका ४० वर्षाच्या तृतीयपंथीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
एक महिला उत्तमनगरमधील भाजी विक्री दुकानासमोर बसली होती. त्यावेळी या तृतीयपंथीने तिला मारहाण करुन तिच्याकडे असलेले पैसे जबरदस्तीने घेत होता. त्यावेळी फिर्यादी महिला तिला सोडविण्यासाठी गेल्या असताना त्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्याकडील २५० रुपये हिसकावून घेतले. त्यांचे कसे ओढून त्यांना रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आणखी दोन महिलांच्या अंगावर धावून त्यांना हाताने मारहाण केली.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.