शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 8:45 PM

महिलांकडून विनयभंगाची तक्रार; वानवडीतील केदारीनगर येथील घटना...

पुणे : महिला बचत गटाचे ऑफिस सुरु करण्यासाठी घर खाली करा असे म्हणून ६ ते ७ महिलांनी एका महिलेला व तिच्या मुलीला मारहाण करीत घराबाहेर काढले. ही घटना वानवडीतील केदारीनगर येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ ते ७ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या पतीविरोधात बचत गटाच्या महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला पती व मुलीसह केदारीनगरमध्ये भाड्याने राहतात. त्यांचे काही महिन्यांपासून घराचे भाडे थकले होते. मंगळवारी सकाळी काही महिला त्यांच्या घरात शिरल्या. तुम्ही आताच्या आता घर खाली करा, आम्ही आता येथे राहणार आहोत, असे सांगितले. त्यावर त्यांनी तुम्ही कोण अशी विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही येथे महिला बचत गटाचे ऑफिस उघडणार आहे. त्यावर फिर्यादी यांनी माझे पती बाहेर गेले आहेत. ते आल्यावर बघु असे सांगितले. तेव्हा या महिलांना त्यांना व मुलीला शिवीगाळ करुन मारहाण केली व घराबाहेर काढले. दरम्यान, फिर्यादी यांनी २०१९ पासून घरभाडे दिले नाही. तसेच त्यांचा भाडेकरार संपल्याने घरमालकाने महिला बचत गटाशी या रुमचा करार केला होता. त्यांना ८ दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार ८ दिवसांनी या महिला आल्या़ तरी त्यांनी घर खाली केले नाही. फिर्यादीच्या पतीला फोन केल्यावर त्याने शिवीगाळ केली. त्यावरुन आता या महिलांनी विनयभंगाची तक्रार दिली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :WanvadiवानवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंगWomenमहिला