Beating a girl with a women to bring down the house; crime registred against Bachat group women | घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल

घर खाली करण्यासाठी महिलेसह मुलीला मारहाण; बचत गटाच्या महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : महिला बचत गटाचे ऑफिस सुरु करण्यासाठी घर खाली करा असे म्हणून ६ ते ७ महिलांनी एका महिलेला व तिच्या मुलीला मारहाण करीत घराबाहेर काढले. ही घटना वानवडीतील केदारीनगर येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने वानवडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ ते ७ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या पतीविरोधात बचत गटाच्या महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला पती व मुलीसह केदारीनगरमध्ये भाड्याने राहतात. त्यांचे काही महिन्यांपासून घराचे भाडे थकले होते. मंगळवारी सकाळी काही महिला त्यांच्या घरात शिरल्या. तुम्ही आताच्या आता घर खाली करा, आम्ही आता येथे राहणार आहोत, असे सांगितले. त्यावर त्यांनी तुम्ही कोण अशी विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही येथे महिला बचत गटाचे ऑफिस उघडणार आहे. त्यावर फिर्यादी यांनी माझे पती बाहेर गेले आहेत. ते आल्यावर बघु असे सांगितले. तेव्हा या महिलांना त्यांना व मुलीला शिवीगाळ करुन मारहाण केली व घराबाहेर काढले. 
दरम्यान, फिर्यादी यांनी २०१९ पासून घरभाडे दिले नाही. तसेच त्यांचा भाडेकरार संपल्याने घरमालकाने महिला बचत गटाशी या रुमचा करार केला होता. त्यांना ८ दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार ८ दिवसांनी या महिला आल्या़ तरी त्यांनी घर खाली केले नाही. फिर्यादीच्या पतीला फोन केल्यावर त्याने शिवीगाळ केली. त्यावरुन आता या महिलांनी विनयभंगाची तक्रार दिली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Beating a girl with a women to bring down the house; crime registred against Bachat group women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.