शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:52 PM

तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली...

पिंपरी : डांगे चौक येथे वाहतूक नियमन करत असताना दोन व्यक्तीने तिथे येऊन फिर्यादी यांच्याशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. २५) थेरगाव येथील डांगे चौकात घडली.याप्रकरणी बाबासाहेब रामचंद्र पावसकर (पोलीस नाईक २३९, हिंजवडी वाहतूक विभाग) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय तुलसीदास शिरसाट (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), किरण सोनाजी राठोड (वय २४, रा. ताथवडे) यांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब हे डांगे चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी मोटारसायकल ( एमएच १३ एक्यु १८७७) घेऊन विरुद्ध बाजूने आले. त्यांना बाबासाहेब यांनी हटकले असता आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुकी केली. तसेच तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली. तुला बघून घेतो, तु येथे कसा नोकरी करतो. तुझी वर्दीच उतरवतो असे म्हणत धमकी दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस