सावधान..! मद्यप्राशन करून वाहन चालवले तर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:18 IST2025-03-14T09:18:03+5:302025-03-14T09:18:54+5:30
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर विशेष ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सावधान..! मद्यप्राशन करून वाहन चालवले तर होणार कारवाई
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांकडून अचानक अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर देखील पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर विशेष ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिस ठाण्यांची तब्बल ८० पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत. सकाळी ११ ते रात्री दीड वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच अन्य रस्त्यांवर देखील नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राइव्ह ची कारवाई केली जात आहे.
दरम्यान होळी साजरी केल्यानंतर मद्यप्राशन करून जर कोणी वाहन चालवताना आढळून आले तर त्याच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याशिवाय संबंधित वाहन जप्त करण्याची प्रक्रिया देखील पोलिस करणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. त्यामुळे पुणेकरांनी होळी साजरी करताना मद्यप्राशन न करता वाहन चालवावे असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.