शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बीडीपी स्वागतार्ह, पण निवाऱ्याचं काय?

By admin | Updated: August 8, 2015 00:55 IST

सरकारने मंदगतीने पर्यावरणाच्या नावाखाली बी. डी. पी आरक्षणावर अखेर शिक्कामोर्तब केले. राजकीय पक्षांच्या मंडळींनी व स्वयंसेवी संस्थांच्या मंडळींनी या निर्णयाचे स्वागत केले

विष्णू गरूड, पुणेसरकारने मंदगतीने पर्यावरणाच्या नावाखाली बी. डी. पी आरक्षणावर अखेर शिक्कामोर्तब केले. राजकीय पक्षांच्या मंडळींनी व स्वयंसेवी संस्थांच्या मंडळींनी या निर्णयाचे स्वागत केले. पर्यावरणाच्या दृष्टीने जरी निर्णय स्वागतार्ह असला तरी भारतीय राज्यघटनेने जे महत्त्वाचे मूलभूत अधिकार या देशातील नागरिकांना दिले ते म्हणजे - अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व व्यक्तीस्वातंत्र्य या मूलभूत अधिकारापैकी ‘निवारा, या मूलभूत अधिकारावर बी. डी. पी.मुळे गदा आली.’वास्तविक पाहता गेल्या साठ वर्षांत सर्वसामान्य नागरिकाला हक्काचा निवारा कायद्याच्या दृष्टीने सुटसुटीतपणे कसा उपलब्ध होईल, याचा विचार सरकारनं केला ना स्वयंसेवी संस्थांनी केला. निवाऱ्याच्या दृष्टीने सर्व सूत्रे राज्यकर्त्यांनी हलविली पाहिजे होती. प्रसंगी शासनाने योग्य दरात नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावयास पाहिजे होता. मात्र याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष झाले. समाविष्ट तेवीस गावांत बी. डी. पी.चे आरक्षण पडले. यामुळे या भागातील सर्वसामान्य गुंठेवारीधारक व सदनिकाधारक अडचणीत आला आहे. जाचक अटींमुळे सर्वसामान्यांनी निवाऱ्याच्या दृष्टीने बांधकामे केली. तसेच या भागातील बिल्डरांनी कायदा हातात घेऊन वाटेल तशी बांधकामे केल्यामुळे सदनिकाधारक अडचणीत आला. शासनानेसुद्धा गेल्या ६० वर्षांत पर्यावरणाच्या हितासाठी ठोस उपाययोजना केली नाही. गुंठेवारी कायद्याअंतर्गत डोंगरउतार व डोंगरमाथ्यावर बांधकाम करता येत नाही. हाच कळीचा मुद्दा बी. डी. पी.धारकांना आड आला व बीडीपीधारकांसाठी पुढे येत नाही हे दुर्दैव आहे. शासनाने जर ६० वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गावठाण विस्तार केला असता, तसेच औद्योगिकीकरणाचे क्षेत्र जाहीर केले असते, तसेच पर्यावरणाचे क्षेत्र जाहीर केले असते, तर आज सर्वसामान्य रहिवाशांवर ही वेळ आली नसती.