शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 5:37 PM

पुणे स्टेशन परिसर, मालधक्का, शिवाजीनगर, हडपसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांची अन्नपाण्याची व्यवस्था.

ठळक मुद्देकोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर

धनाजी कांबळे - पुणे : देशात लॉकडाउन असल्याने अनेक ठिकाणी बांधकाम मजूर, कष्टकरी, हातावर पोट असलेले लोक अतिशय कठिण परिस्थितीत जगत आहेत. शहरातील अनेक रस्त्यावर निराधार, गरीब लोक अन्नपाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गरीब, कष्टकरी, कामगारांसाठी अन्नदाता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुढे आली आहे.कोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या काळात बेघरांसाठी, अनाथांसमोर अन्नपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, या सामाजिक जाणीवेतून बाटीर्ने या काळात अन्नपाणी पुरवण्याचे काम हातात घेतले आहे.बार्टीचे संचालक कैलास कणसे, निबंधक यादव गायकवाड आणि त्यांची टीम यासाठी विशेष प्रयत्न करीत असून, साठी अन्नपाण्याची व्यवस्था येरवड्यातील निवासी शाळेच्या भोजनालयात जेवण तयार करून दररोज सायंकाळी साधारण ५०० ते ६०० लोकांना जेवण पुरवण्यात येते. यासाठी बार्टीमध्ये काम करीत असलेले कर्मचारीच एकदिवसाआड कामावर येऊन पुरेशी काळजी आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे काम करीत आहेत.त्याचप्रमाणे केवळ द्यायचे म्हणून नव्हे, तर गरीब असले तरी ती हाडामांसाची माणसेच आहेत, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीतून जेवणाची गुणवत्ता तपासून उत्कृष्ट दजार्चे जेवण दिले जाते. त्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली असून, बेघर व गरीब वस्त्या, झोपड्यांजवळ थांबून अधिकारी व कर्मचारी हे भोजनाची व्यवस्था करीत आहेत.पुणे स्टेशन परिसर, महापालिकेचे निवारा केंद्र, मालधक्का, महापालिका परिसर, शिवाजीनगर, हडपसर येथील रामटेकडी परिसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांना अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे. ५०० ते ६०० लोकांना सध्या अन्नदान केले जात असून, मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फूड पॅकेट्स आणि पाणी यांची संख्याही वाढविण्याचा विचार आहे. प्रकल संचालक नितीन सहारे, सहा. प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, सुरक्षा रक्षक सुपरवायझर बाळासाहेब ढमाले, सुरक्षारक्षक गोपाळे, दर्शन सकट, वाहनचालक विश्वनाथ दोंडगे, सखाराम कदम, प्रदीप भालेराव यांच्यासह अनेक कर्मचारी या कामात स्वत:हून एकदिवसआड सहभागी होत आहेत.---कोरोनाचे संकट देशावरच आल्याने लॉकडाउनची स्थिती आहे. या काळात गरीब, निराधारांची अन्नपाण्यावाचून फरपट होऊ नये, यासाठी सामाजिक जाणीवेतून आम्ही दररोज ५०० ते ६०० जणांना भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही अन्नपाणी पुरवत आहोत. आपत्तीच्या काळात सर्वांनीच अशा निराधार माणसांचा आधार बनायला हवं. आम्ही बार्टीच्या वतीने जेवढे शक्य आहे, तेवढं करीत आहोत.- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी---

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न