शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा

By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST

नवी नवी हळद, नवा हिरवा चुडा आहे, १४ फेब्रुवारीला बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा आहे’

कोथरूड : ‘नवी नवी हळद, नवा हिरवा चुडा आहे, १४ फेब्रुवारीला बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा आहे’ या वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या तसेच ‘ढाल बनून लढताही यावं, सल बनून सलताही यावं, माणूस म्हणून माणसांशी, माणसासारखं बोलताही यावं’ या अस्मिता जोगदंड यांच्या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.निमित्त होते कोथरूड येथील शिक्षकनगरमध्ये जागतिक मराठी भाषा दिन व शब्दश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अनुभूती मराठी कविसंमेलनाचे. नगरसेवक अ‍ॅड. चंदू कदम यांनी आयोजित केलेल्या या काव्य मैफलीमध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. अशोक थोरात, प्रकाश होळकर, नारायण सुमंत, शिवाजी सातपुते, प्रकाश घोडके, तुकाराम धांडे, अस्मिता जोगदंड, भरत दौंडकर, रमजान मुल्ला, प्रशांत मोरे आदी प्रसिद्ध कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रकाश होळकर यांनी, ‘जगणं जर का सोपं असतं, तर अशी कण्हत कण्हत जगली नसती माणसं’ ही रचना सादर करून रसिकांच्या आग्रहास्तव ‘माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला’ हे गीतदेखील सादर केले. शिरूर येथील भरत दौंडकर यांनी ‘फाटकी शाळा’ या कवितेतून दगडखाणीत काम करणाऱ्या लहान मुलांचे आयुष्य अतिशय प्रभावीपणे मांडले. कल्याणचे कवी प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘दे रे आभाळा दे पाणी’ ही दुष्काळावरील रचना सादर केली. कोरड्या गं हौदापाशी, माझा ज्योतिबा गं उभा, त्याच्या डोळ्यांत जमली, खाऱ्या आसवांची सभा’ हा कवितेचा शेवट ऐकून रसिकांच्या डोळ्यांत देखील पाणी तरळले. (वार्ताहर)४नाशिकच्या तुकाराम धांडे यांनी ‘भूगोल’ नावाची एक अनोखी कविता सादर केली. अमरावतीहून आलेले डॉ. अशोक थोरात यांनी गझल-फजल-हजल अशा रचना सादर करून रसिकांना मनमुराद हसविले.