शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आरक्षणासाठी बारामतीत रामोशी समाजाचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:18 IST

रामोशी समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाजाच्या वतीने शहरातील प्रशासकीय भवन येथे मोर्चा काढण्यात आला

बारामती : रामोशी समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. २३) शहरातील प्रशासकीय भवन येथे मोर्चा काढण्यात आला.दुपारी कारभारी सर्कल, गुणवडी चौक, बस स्टँड, रिंगरोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला. या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी सांगितले की, बेरड नायका बेरड समाज हा इतर राज्यांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये आहे. त्यामुळे इतर राज्यात रामोशी समाज बांधवांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात आमच्यावर अन्याय होत आहे. मात्र, आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही.या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.मागील अनेक वर्षांपासून समाजातील विविध संघटनांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तसेच शासनाच्या विविध पातळीवर निवेदने दिली. महाराष्ट्रस्तरावर रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हा समाज सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागास असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आले होते. आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत निर्णय झाला नाही. या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, मोहन मदने, संजय जाधव, शारदा खोमणे, सुनील चव्हाण,अंकुश जाधव, सुनील धिवार आदींची भाषणे झाली. संभाजी चव्हाण, नवनाथ मदने, आबा जाधव, मनोज पाटोळे, नाना जाधव, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सोमनाथ मदने, सागर खोमणे, गणेश जाधव, दादा चव्हाण, मालोजी जाधव, किरण खोमणे, अनिल मसुगडे, अमोल चव्हाण आदींनी मोर्चा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, भरत खैरे, सनी पाटील यांनी मोर्चाला भेट दिली....अन्यथा तीव्र आंदोलनरामोशी समाज शांततेने आरक्षणाची मागणी करीत आहे. २५ तारखेपर्यंत आमची मागणी मान्य व्हावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा जिल्ह्यात समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती