बारामतीच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 11:38 IST2021-10-28T11:37:57+5:302021-10-28T11:38:12+5:30
अचानक बदली झाल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

बारामतीच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली
बारामती : बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची बुधवारी(दि २७) रात्री अचानक बदली करण्यात आली आहे. शिंदे यांची अचानक बदली झाल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
पोलीस निरीक्षक शिंदे यांची पुणे नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. तर बारामती शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्याकडे देण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
शिंदे यांनी नोव्हेेंबर २०२० मध्ये शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला होता. मात्र, निर्धारित कालावधी सोडाच एक वर्ष पुर्ण होण्यापूर्वीच शिंदे यांची बदली झाल्याने याबाबत चर्चांना उधाण आले आहे. शहरात गेल्या आठवड्यात एका अधिकाऱ्याच्या खमंग कारनाम्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. या पार्श्वभुमीवर शिंदे यांची बदली नेमक्या कोणत्या कारणाने झाली. शिंदे यांची अशी कोणती चुक त्यांना महागात पडली. याची आजपासून पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.