शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग एप्रिलअखेर; वीस वर्षांपासून रखडले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:35 IST

बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ठळक मुद्देलाटे, माळवाडीचे भूसंपादन पूर्ण, १३७ बाधितांना ४१.१७ कोटींचा मोबदलाभूसंपादनासाठी प्रशासनाला ११५.५७ कोटी रुपये प्राप्त

रविकिरण सासवडे - बारामती : बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाचे बारामती तालुक्यातील भूसंपादन एप्रिलअखेर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी लाटे व माळवाडी या गावांचे भूसंपादन प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. या गावांमधील ३२ हेक्टर २० आर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. यामधील १३७ बाधितांना ४१.१७ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ पासून या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली होती. यानंतर दोन गावांचे भूसंपादन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले होते. या वेळी मंत्रालयात खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला होता.  बारामती-फलटण-लोणंद या एकूण ६३ किलोमीटरपैकी ३७.२० किलोमीटर रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या संदर्भात भूसंपादनासाठी २३९ कोटी रुपयांची आवश्यक आहे. भूसंपादनासाठी प्रशासनाला ११५.५७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर, प्रशासनाने १२४.०२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे.वीस वर्षांपासून या रेल्वेमार्गाचे काम रखडले होते. बारामती तालुक्याच्या बागायती भागातून हा रेल्वेमार्ग जात असल्याने मध्यंतरी जिरायती भागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार, बारामती तालुक्यातील १३ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. दक्षिण भारताला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून या रेल्वेमार्गाचे महत्त्व आहे. बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बऱ्हाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोरटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तादूळवाडी आदी गावांमधून हा रेल्वेमार्ग जातो. यापैकी लाटे, माळवाडी गावांमधील भूसंपादन खासगी वाटाघाटीने पार पडले आहे. नेपतवळण, तांदूळवाडी, सावंतवाडी, बऱ्हाणपूर आदी गावांच्या मूल्यांकनासाठी बुधवारी (दि. ४) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. थोपटेवाडी, सोनकसवाडी गावांची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तर, कऱ्हावागज, कटफळ आदी गावांची कागदपत्रे प्रसिद्ध होणे बाकी आहे. मात्र, यामध्ये कुरणेवाडी, ढाकाळे, खामगळवाडी, थोपटेवाडी आदी गावांचा भूसंपादनाला विरोध आहे. बारामती तालुक्यातील नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्थानके विकसित करण्यात येणार आहेत.............भूसंपादनाची सद्य:स्थिती एकूण लांबी     :                       ६३.६५ किमीबारामती तालुक्यातील     :    ३७.२० किमीबाधित गावे  :                       १३संपादन करायचे क्षेत्र   :        १८०.५५ हेक्टरसंपादित क्षेत्र     :                 ३२.३१ हेक्टर शिल्लक क्षेत्र     :               १४८.२४ हेक्टर एकूण गट     :                     ३१२संपादित गट     :                 ५१शिल्लक गट     :                  २६१एकूण खातेदार     :             २,६३८संपादित खातेदार     :        १३७शिल्लक खातेदार     :        २,५०१    ............भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच संपूर्ण रेल्वेमार्गाचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न आहे. - दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती........

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारrailwayरेल्वेFarmerशेतकरी