शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सदोष वायरजोडणीमुळे बारामती पालिकेला आग

By admin | Updated: March 17, 2015 23:16 IST

अंतर्गत वायरिंगच्या सदोष जोडणीमुळे बारामती नगरपालिकेच्या तळमजल्याला आग लागली, असा निष्कर्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

बारामती : अंतर्गत वायरिंगच्या सदोष जोडणीमुळे बारामती नगरपालिकेच्या तळमजल्याला आग लागली, असा निष्कर्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. जवळपास ४५ ते ४६ लाखांचे या आगीत नुकसान झाले आहे. बांधकाम व नगररचना विभागाचे जास्त नुकसान झाले. त्यामुळे जळालेल्या फायली परत मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. दि. ७ मार्च रोजी रात्री नगरपालिकेला भीषण आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी तळमजल्याच्या डाव्या बाजूला शॉर्टसर्किट होत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. १७ मिनिटांनंतर आगीचा भडका झाला. त्यानंतर कॅमेरादेखील जळून खाक झाला. विशेष म्हणजे, मुख्य सर्व्हर शाबूत राहिल्याने महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे, असे या वेळी सांगण्यात आले. नगररचना विभागात बांधकाम व्यावसायिकांनी, नागरिकांनी सादर केलेल्या फायलींची प्रत पुन्हा द्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. याशिवाय, नगररचना खात्याकडे नगरपालिकेच्या असलेल्या फायली मागवून घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, राज्य सरकार, विभागीय आयुक्त, नगरविकास विभाग आदी विभागांकडे केलेल्या पत्रव्यवहारांची प्रत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तळमजल्याच्या डाव्या कोपऱ्यालगत रात्री ९ पासून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रण झाले आहे. याशिवाय, जवळपास १६ ते १७ मिनिटे शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या बाहेर पडत होत्या. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे प्रकार वेळीच लक्षात आला नाही. एकाच ठिकाणी अनेक वायरींचे जाळे असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. सामान्य प्रशासन विभाग, रचना विभाग, लेखा विभाग, जागाभाडे, घरपट्टी आदी खात्यांचे नुकसान झाले. नगरपालिकेत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची आवक-जावक रजिस्टर उपलब्ध असल्यामुळे कोणत्या प्रकारची कागदपत्रे जळाली, याची माहिती मिळणे शक्य झाले आहे. महावितरणचे परिमंडल मुख्य कार्यकारी अभियंता इरवाडकर, शहराचे अभियंता देवकाते यांनी पाहणी केली होती. त्यानंतर महावितरणच्या निरीक्षकांना आगीच्या कारणांची माहिती घेण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी स्वतंत्रपणे पंचनामा केला होता. महावितरणच्या निरीक्षकांनी अंतर्गत सदोष वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट झाले; त्यामुळे आग लागली, असे कारण दिले आहे. भिजलेली कागदपत्रे असली तरी त्यातून माहिती उपलब्ध होत आहे. उर्वरित कागदपत्रे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांकडून प्राप्त केली जाणार आहेत. ज्यांच्याकडे स्थळप्रत आहे, त्यांनी नगरपालिकेत त्याची एक प्रत सादर करावी, असे आवाहन नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. नगरपालिकेच्या या विभागातील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वेळीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उर्वरित आग विझविण्यास अडचण आली नाही. (प्रतिनिधी)दुसऱ्या दिवशीच सर्व विभागांचे कामकाज सुरू आग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सर्व विभागांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभाग नगरपालिकेच्या स्थायी समिती विभागात सुरू करण्यात आला आहे. नगररचना मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पहिल्या मजल्यावर, लेखा विभागदेखील याच विभागात सुरू करण्यात आला आहे. जागाभाडे विभाग पालिकेच्या पहिल्या मजल्यावर आणि घरपट्टी विभाग नगरपालिकेच्या समोरील जुन्या माहिती कार्यालयात सुरू करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षांनी सांगितले.