शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसी सुरुच राहणार;कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने उद्योगांवर होती टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:55 IST

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने कटफळसह एमआयडीसी परिसर सील होण्याची टांगती तलवार उद्योगांवर होती.

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; धास्तावलेल्या उद्योजकांना दिलासा...उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल

बारामती: पुणे जिल्ह्यात एमआयडीसी सुरु करण्यास परवानगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी(दि. ४) दिली.मात्र, दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरातील कटफळ गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यामुळे कटफळ सह एमआयडीसी परिसर सील होण्याची टांगती तलवार उद्योगांवर होती.मात्र,  ‘कंटेन्मेंट झोन’ मधुन हा परिसर वगळल्याने एमआयडीसी सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेबकांबळे यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.बारामती तालुक्यातील कटफळ येथे हा रुग्ण सापडला. त्याच्यावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत. बारामती एमआयडीसी परिसर कटफळ गावालगत आहे. महत्वाच्या कंपन्या याच परिसरात आहेत. मात्र, कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर कटफळ गाव ''बफर झोन '' म्हणुन घोषित करण्यात आले. आज सापडलेल्या रुग्णामुळे उद्योग सुरु करण्याची गणिते बदलण्याची भीती उद्योजकांना होती. मात्र, एमआयडीसी परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ मधुन वगळण्यात आल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी ''लोकमत''शी बोलताना स्पष्ट केले आहे. उद्योग सुरुच राहणार आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील कामगार वापरु नये.त्या भागात कोणतीही वाहतुक करु नये,अशा सुचना दिल्याचेप्रांताधिकारी कांबळे यांनी सांगितले.

एमआयडीसी नुकतीच सुरु झाल्याने कंपनी सुरु करण्याच्या हालचाली सुरु असतानाच कोरोनाचा रुग्ण सापडला.त्यामुळे कंपनी सुरु होणार का, असे प्रश्नचिन्ह उद्योग विश्वासमोर होते.त्यातुन उद्योजक,कामगार,कच्चा माल पुरवठादार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज चे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्याकडे याबाबत विचारणा करणारे अनेक फोन आल्याचे कुंभार यांनी '' लोकमत''शी बोलताना सांगितले.दरम्यान, उद्योजक संघटना पदाधिकाऱ्यांची या भीतीने दमछाक झाली होती.मात्र, प्रशासनाच्या निर्णयामुळे उद्योजकांचाजीव आता भांड्यात पडला आहे.———————————————...उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखलआज कोरोना रुग्ण सापडलेला कटफळ परीरात एमआयडीसी आहे.या भागात अनेक कंपन्या आहेत.नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपन्या सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच भागात रुग्णसापडला आहे.त्यामुळे प्रशासन या भागात निर्बंध लादण्याची शक्यता लक्षात घेवुन उद्योजकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क साधुन याबाबत उद्योजकांच्या वतीने विनंती केल्याचे सांगितले.पवार यांनी या मागणीची दखल घेतल्याचे जामदार म्हणाले. दरम्याप, कटफळ परिसरातील कोणालाही काही दिवस कामावर येऊ न देण्याची सूचना प्रशासनाने केल्याचे अध्यक्ष जामदार यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीMIDCएमआयडीसीAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम