शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:10 IST

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले.

Baramati Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत आहे. यामुळे या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटावर केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

आमदार सुनिल शेळके म्हणाले, बारामतीच्या युवराजांना मला एवढं सांगायचं आहे की, निवडणुकीची प्रक्रिया होत असताना लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. आपण प्रचाराकरिता आपल्याकडे नोकरीला असलेल्या कामगार बांधवांना प्रचारात उतरवलं यात आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. आमच्या अजितदादांचे सहकारी, तालुक्यातील समर्थक प्रचार करत असताना तुम्ही त्यांच्या गाड्यांमध्ये पैसे टाकले, अर्धवट व्हिडीओ बनवले, खोटे आरोप केले. मला त्यांना एवढच सांगायचं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, पराभव समोर दिसू लागला आहे म्हणून भोरमधील स्थानिक गुंडांना बरोबर घेऊन  भोर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना जी काही मारहाण केली, त्या मारहाणीची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल. आम्ही पोलिसांत कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

राजकारण करत असताना रोहित पवार राम कृष्ण हरी वाजवा तुतारी सांगत होते, पण अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या खंडोबा रायाच्या पायथ्याला मटणाच्या दोन दोन हजार टनाच्या गाड्या तुम्ही खाली केल्या. तिथं दारु,पैसे वाटले. तुम्ही आम्हाला राजकारण आणि स्वाभिमान शिकवू नये. रोहित पवार यांची नौटंकी सुरू आहे त्यांची आम्ही भांडफोड करत आहे त्यामुळे ते आम्हाला टारगेट करत आहेत. मला त्यांना एवढंच सांगायचे आहे, नौटकी करुन राजकारण करु नका, साहेबांच्या नावाचा वापर करुन आपल्याला महाराष्ट्रात नेते होण्यापेक्षा स्वत:चे कतृत्व दाखवून मोठं व्हावं, दादांना बदनाम करुन, दादांना व्हिलन ठरवून आपण मोठे होणार नाहीत. उद्याचा निकाल आल्यानंतर काय परिस्थिती आहे हे समजेल, असा टोलाही आमदार सुनिल शेळके (Sunil Shelake) यांनी रोहित पवार यांना लगावला. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४