बारामती : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष वृक्षसंपदेच्या मुळावर आले आहे. बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे. आता तर दिवसाढवळ्या या वृक्षांचे अपरिमित नुकसान केले जात आहे. रस्त्याच्या कडेने शेकडोवर्षांपूर्वीचे वृक्ष आहेत. यामध्ये देशीबाभूळ, वड, कडूनिंब यासारखे देशी वृक्ष मोठ्याप्रमाणात आहेत. सोमवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास बेलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील खारओढा येथे दोन ते तीन भुरटे चोर देशी बाभळीच्या झाडांची साल काढताना येथील जागरूक नागरिकाला अढळून आले. संबंधित नागरिकाने या चोरट्यांना हटकले असता त्यांनी काढता पाय घेतला. हे भुरटे चोर मोटारसायकल, कुऱ्हाड तसेच पिशवीमध्ये बाभळीची साल घेऊन पसार झाले. देशी बाभळीची साल काही मद्यपी व भुरटे चोर दिवसाढवळ््या काढून नेतात. यामुळे बाभळीचे झाड काही दिवसात जळून जाते.
४रस्त्याच्या कडेने असणारी संपूर्ण वृक्षसंपदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरातील याच महामार्गाच्या कडेला असणारा वटवृक्ष मानवनिर्मित आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याबाबत वृत्तपत्रातून बातमी देखील प्रसिद्ध झाली. मात्र, संबंधितांना केवळ नोटीस देण्यापलीकडे बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या माथेफिरूचे धाडस वाढू लागले आहे. येथील झाडांना नुकसान पोहोचवणाºयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. ..........ज्या ठिकाणी झाडांना इजा पोहोचवली गेली आहे, तेथे पाहणी करण्यासाठी कर्मचाºयांना पाठविणार आहे. तसेच, या रस्त्याच्या कडेने असणाºया झाडांना इजा पोहोचणार नाही, याची देखील काळजी घेऊ.- पी. व्ही. पंडित, उपअभियंता, भिगवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग