बारामती: सरकारी अधिकाऱ्यांचा त्रासामुळे कॅमेऱ्यासमोर विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:41 PM2024-04-15T15:41:53+5:302024-04-15T15:49:11+5:30

शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर चित्रण करत विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे...

Baramati: Farmer ended life by consuming poison in front of camera due to harassment by government officials | बारामती: सरकारी अधिकाऱ्यांचा त्रासामुळे कॅमेऱ्यासमोर विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

बारामती: सरकारी अधिकाऱ्यांचा त्रासामुळे कॅमेऱ्यासमोर विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

सोमेश्वरनगर (पुणे) : पाटबंधारे खाते, महावितरण विभाग व शेजारील आठ शेतकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर चित्रण करत विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हनुमंत पांडुरंग सणस (वय ६० रा. लाटे ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग, महावितरण विभागाला कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सर्व माहिती सांगितली आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या शेतामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले.

नंतर हनुमंत सणस आणि त्यांचा भाऊ तिथे जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. याळा कंटाळून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे असे त्यांचे भाऊ जयवंत सणस यांनी सांगितले आहे.

Web Title: Baramati: Farmer ended life by consuming poison in front of camera due to harassment by government officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.