बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:29 IST2025-01-30T20:26:57+5:302025-01-30T20:29:03+5:30
बस जेजुरी बसस्थानकावर आल्यानंतर चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच ते बेशुध्द पडून मृत्यू झाला

बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक
बारामती: बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी मुरूम ते पुणे प्रवासाला निघालेली एसटी बस स्थानकावर थांबल्यानंतर एसटीबस चालक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने स्थानकारवरच बेशुध्द पडले. यावेळी त्यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले.
निलेश एकनाथ शेवाळे (वय ५२)असे चालकाचे नाव आहे. शेवाळे हे गुरुवारी(दि ३०) मुरुम येथून पुणेच्या दिशेने निघाले होते. यावेळी सकाळी ७.३० च्या सुमारास एसटी बस जेजुरी बसस्थानकावर आल्यानंतर शेवाळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, त्यातच ते बेशुध्द पडले. त्यांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान एसटीबसमध्ये काही प्रवाशी देखील होते. मात्र, जेजुरी येथे एसटी बस थांबल्यावर ही घटना घडली.
याबाबत बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी सांगितले कि, जेजुरी बसस्थानकात एसटी बस थांबल्यावर निलेश शेवाळे यांना त्रास जाणवला. शेवाळे यांनी याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले. मात्र, ते बेशुध्द झाले. त्यांना तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शेवाळे यांच्यावर त्यांच्या निरा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे घोगरे यांनी सांगितले.