शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-दौंड रेल्वेमार्गाचे होणार विद्युतीकरण

By admin | Updated: June 16, 2017 04:39 IST

पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आता दौंड-बारामती रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आता दौंड-बारामती रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम लवकरच मार्गी लागणार आहे. आज रेल्वेचे अधिकारी, नगरपालिका पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी रखडलेल्या सेवा रस्त्यासाठी रेल्वेने परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्या केल्या.पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांची रेल्वेच्या प्रश्नावर शुक्रवारी (दि. १६ जून) पुण्यात बैठक आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने बारामती रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या अडचणींच्या बाबतीत आढावा बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह मुख्याधिकारी मंगेश चितळे, रेल्वेचे सहाय्यक कमर्शिअल प्रबंधक व्ही. एस. कांबळे, खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, सहाय्यक सिद्धेश्वर शिंपी, नगरपालिकेचे अभियंता रत्नरंजन गायकवाड, रेल्वेचे विभागीय अभियंता प्रसन्न सोनवणे, नितिन सातव, अनिता गायकवाड, राजेश कांबळे, सतिश फाळके, बारामती रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.रेल्वे स्थानक कॅमेऱ्याच्या नजरेतरेल्वे स्थानकात विश्रांतीगृहाचे सुशोभीकरण, सुविधा तसेच रेल्वे स्थानकावर आत, बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची पूर्तता खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत तातडीने केली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.मालधक्का स्थलांतरित कराबारामती रेल्वेच्या संदर्भात पहिल्यांदाच आढावा घेण्यात आला. बारामती शहरातील रेल्वेच्या मालधक्क्याचे मागील २० वर्षांपासून स्थलांतरित करण्याची मागणी आहे. या मालधक्क्यामुळे भिगवण रस्त्यावर धावणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अनेकदा अपघात झाले. आता यावर पुण्यातील आढावा बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले जाईल़