शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बंदी; कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 4:33 PM

पुण्यातले जिल्हाधिकारी कार्यालय हे शहरातल्या अनेक आंदोलनांचे मुख्य ठिकाण आहे.

पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायला बंदी घातल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मुख्य रस्त्यावर आंदोलन न झाल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही असे या आंदोलकांचे मत आहे. 

पुण्यातले जिल्हाधिकारी कार्यालय हे शहरातल्या अनेक आंदोलनांचे मुख्य ठिकाण आहे. मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने बांधले गेल्यापासुन गेट समोरचे आंदोलनांचे ठिकाण बदलण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण सुरुवातीला झालेला विरोध आणि पाठोपाठ कोरोना मुळे असलेले लॅाकडाउन त्यामुळे याची अंमलबजावणी झाली नव्हती. 

आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनासाठी दुसरे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. आता या आंदोलकांना पोलिस आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या एका ग्राउंड मध्ये आंदोलनासाठी निश्चित करण्यात आले आहे. हे मुख्य रस्त्यावर नसल्यामुळे आंदोलनांची दखल घेतली जाणार नाही अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याविषयी अंजुम इमानदार म्हणाले ,” कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. आंदोलन करून लोकांपर्यंत संदेश द्यायचा असतो तो जाणार नाही.त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी.”

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय