शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 15:29 IST

सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते, परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळतोय

डेहणे (पुणे): खेड तालुक्यातील पश्चिम व पुर्व पट्ट्याला वरदान ठरलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पुर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कळमोडी धरण रविवारी (दि. २१) पहाटे पुर्ण क्षमतेने भरल्यावर पहाटे साडेपाचच्या दरम्यान धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. धरणाची २.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. कळमोडी धरण भरल्यानंतर चासकमान धरणाच्या जलसाठा वाढण्यास मदत होते .१ जुनपासून ४६६ मी.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी १७ जुलैला भरलेल्या धरणाला चालुवर्षी २१ जुलै हा दिवस उजाडला आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.    आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या भागासाठी आरक्षित पाणी चासकमान प्रकल्पाचा घळभरणीसाठी वापरण्यात येते, परंतु प्रकल्पासाठी कालवा नसल्याने आरळा नदीच्या पात्रातून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, देवोशी व अंतर्गत कुडे, बांगरवाडी, येनिये या गावातला सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना ह्या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे.

प्रत्यक्षात धरणाची साठवण क्षमता जरी १.५१ टीएमसी आली तरी अंतर्गत राडारोडा असल्याने  पाणी साठवण पूर्ण क्षमतेने  होत नाही. आतमध्ये असणारा राडारोडा काढण्याची मागणी  गेली अनेक वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात केली जात आहे. सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने नदी खालील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रातील शेतीविषयक औजारे वा तत्सम साहित्य अथवा जनावरे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणWaterपाणीDamधरणNatureनिसर्ग