Sanjeevani Karandikar Passes Away: बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनीचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:27 IST2022-05-13T13:27:38+5:302022-05-13T13:27:44+5:30
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले

Sanjeevani Karandikar Passes Away: बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनीचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन
पुणे : थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत.
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते.