पुणे: पुण्यातील पहिल्या ऐतिहासिक 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६'च्या पहिल्याच टप्प्यात खेळाडूंचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुख्य गटाच्या दुसऱ्या ताफ्यातील खेळाडू एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर 'युनियन सायकलिंग इंटरनॅशनल'च्या सुरक्षा नियमांनुसार शर्यत काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या अपघातात जखमी झालेले तीन सायकलपटूंना पहिला टप्पा पूर्ण करता आलेला नाही.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर UCI अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत खेळाडूंना मदत केली. सर्व बाधित खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तांत्रिक टीम सायकलींच्या दुरुस्तीचे काम करत आहे. "खेळाडूंची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
'पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर' दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले होते. मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.
स्पर्धेबाहेर झालेले प्रमुख खेळाडूया अपघातामुळे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपला पहिला टप्पा पूर्ण करता आला नाही. यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश आहे. १. एन्झो फ्युएन्टेस कॅपरोली (Enzo Fuentes Caparoli) - टीम प्रो सायकलिंग स्टॅट्स (Rider No. 191) २. मार्टी रिएरा कॅसानोवास (Marti Riera Casanovas) - टीम प्रो सायकलिंग स्टॅट्स (Rider No. 195) ३. अब्दुल हलील मोहम्मद इज्जत (Abdul Halil Mohd Izzat) - मलेशिया नॅशनल टीम (Rider No. 161)
Web Summary : Pune's Grand Tour saw a major accident on its first stage. Over 70 cyclists collided due to a narrow road, injuring three international riders. The race was temporarily halted, and medical assistance was provided. Safety is the priority, organizers stated.
Web Summary : पुणे ग्रैंड टूर के पहले चरण में बड़ी दुर्घटना हुई। संकीर्ण सड़क के कारण 70 से अधिक साइकिल चालक टकरा गए, जिसमें तीन अंतर्राष्ट्रीय राइडर घायल हो गए। दौड़ अस्थायी रूप से रोक दी गई, और चिकित्सा सहायता प्रदान की गई। आयोजकों ने कहा कि सुरक्षा प्राथमिकता है।