शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते पाहून पुणेकरांचे डोळेच दीपलेत! अशीच दरवर्षी सायकल स्पर्धा घ्यावी म्हणतायत...; इतरवेळी का चकचकीत दिसत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:15 IST

Bajaj Grand Tour Pune 2026 Road work : पुण्यात 'ग्रँड टूर'चा चमत्कार! रातोरात रस्ते चकाचक, पुणेकर सुखावले; "दरवर्षी अशीच स्पर्धा घ्या" म्हणत पालिकेला लगावला टोला

- हेमंत बावकर

पुणे: पुण्यातील खड्डेमय रस्ते आणि उंचसखल ड्रेनेजची झाकणे यांमुळे कंबरदुखीने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून मोठा सुखद धक्का बसला आहे. निमित्त आहे 'बजाज ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे! या स्पर्धेसाठी महापालिकेने जे 'तंत्रज्ञान' वापरून रस्ते गुळगुळीत केले आहेत, ते पाहून पुणेकरांचे डोळे दिपले आहेत. "जर एका स्पर्धेसाठी रस्ते रातोरात चकाचक होऊ शकतात, तर मग इतर वेळी का नाही?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

पुणे महापालिकेने विकास कसा होत नाही, हे ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून दिले आहे. खरेतर सुरुवात दोन-तीन महिन्यांपूर्वीच झाली होती. ड्रेनेजचे झाकण रस्त्यावरच असतात, त्याला आजुबाजुने उंचसखल, खड्डे असतात. त्यातून गेली अनेकवर्षे पुणेकर जात होते. तरी पालिकेला आणि कंत्राटदारांना या पुणेकरांची काहीच पडलेली नव्हती. परंतू, ग्रँड सायकल स्पर्धेची तयारी सुरु झाली आणि कुठूनतरी महापालिकेच्या हाती असे तंत्रज्ञान लागले की या ड्रेनेज होलची लेव्हल आणि रस्त्याची लेव्हल एकदम तुळतुळीत झाली. खड्ड्यांतून गाड्या घालणाऱ्या, डांबराचे पॅच मारून रस्त्यापेक्षा जास्त उंचसखल झालेल्या या भागातून कंबरेला मार देत जाणाऱ्या पुणेकरांना पहिला दिलासा मिळाला तो इथेच. 

यानंतर गेल्या आठवड्यापासून ही स्पर्धा ज्या रस्त्यांवरून जाणार आहे, तेथील रस्ते डांबरी होऊ लागले. रातोरात रस्त्यांवर मस्तपैकी काळी चादर पसरू लागली. सायंकाळी दमून थकून घरी गेलेला पुणेकर सकाळी कामाला परततो तोच अचानक काळे कुळकुळीत रस्ते दिसू लागले. एकदम स्मूथ. एवढे की बजाजच्या इलेक्ट्रीक चेतकचे सस्पेंशनही एकनंबर वाटू लागले आहे. सिग्नलवर कधी नव्हे ते झेब्रा क्रॉसिंगही दिसू लागले आहे. रस्त्याच्या मधले पट्टे देखील आता दिसू लागले आहेत. नाहीतर इतरवेळी पुणेकरांनी मध्यभाग समजूनच गाड्या चालवाव्यात असा समज होता. सिग्नलवर देखील पट्टे नसल्याने थोडे मागेच थांबावे असा प्रघात होता. तो आता नवे पट्टे पुसट होईपर्यंत थोडा बाजुला ठेवावा लागणार आहे. 

नेटकरी काय म्हणतायत...सुरुवातीला रस्ते बंद करत असल्याने पहिल्याच दिवशी पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतू, नंतर जेव्हा या स्पर्धेचा खरा फायदा समजला तेव्हा सोशल मीडियावर वेगळेच सूर उमटू लागले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर ठरवले तर काहीही होऊ शकते, एका रात्रीत रस्ते आणि डिव्हायडरची रंगरंगोटी कसे चकाचक केले गेले आहेत. पुणे महापालिकेने मनावर घेतले तर या रस्त्यांना जोडणारे इतरही जोडरस्ते आणि शहरातील उर्वरित रस्ते देखील याच पद्धतीने चकचकीत केले जाऊ शकतात, असे नेटकऱ्यांचे म्हणणे पडले आहे. काही पुणेकरांनी तर अशी स्पर्धा दरवर्षी घ्यावी, परदेशी सायकलपटूंनी दरवर्षी यावे असे साकडेच घातले आहेत. एकंदरीतच पुण्यात उत्सवाचे वातावरण पहायला मिळत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's roads sparkle for cycle race, residents demand year-round quality.

Web Summary : Pune residents are amazed by the sudden road improvements for an international cycling event. They question why such quality isn't maintained year-round, urging the municipality to prioritize road maintenance for all citizens, not just for special events.
टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगPotholeखड्डे