काल पुण्यातील कर्व रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही गुंड घुसले होते. त्यांच्या हातात कोयते आणि तोंड झाकलेली होती. या गंडांनी तोडफोड करत काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीला धमकावल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले.
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन घोटाळ्यावरुन टोलाही लगावला आहे. तसेच रात्रंदिवस पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून, हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत. पुणेकरांनी किती दिवस दहशतीत रहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पाऊलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही?, असा सवाल पवार यांनी केला.
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
"गुंडांना जामीन नेत्यांना जमीन पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही?, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
"रात्रंदिवस पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून, हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत. पुणेकरांनी किती दिवस दहशतीत रहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पाऊलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही? आणि पुणेकरांसाठी निर्भय वातावरण निर्माण करणार की नाही? , असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
Web Summary : Rohit Pawar criticizes CM Fadnavis over Pune's law and order, citing a hotel attack and land scams. He questions the government's inaction against rising crime and demands measures for Pune's safety, highlighting citizens' fear amidst 'Koyta Gang' terror.
Web Summary : रोहित पवार ने पुणे की कानून व्यवस्था पर फडणवीस की आलोचना की, होटल हमले और जमीन घोटाले का हवाला दिया। उन्होंने बढ़ते अपराध के खिलाफ सरकार की निष्क्रियता पर सवाल उठाया और पुणे की सुरक्षा के लिए उपायों की मांग की, 'कोयता गिरोह' के आतंक के बीच नागरिकों के डर को उजागर किया।