शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वंचित बहुजन विकास आघाडी पुण्यात सर्व जागांवर लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:39 PM

पुणे  : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार लढत दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ...

पुणे  : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार लढत दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामधे उमेदवार उभे करण्याचा निर्णय आघाडीच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात झाली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अग्रहावरुन आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय आघाडीचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी जाहीर केला. महिला शहराध्यक्ष अनिता चव्हाण, अनिल शिंदे, नवनीत अहिरे या वेळी उपस्थित होते. शहरात भाजपाचे ८ आमदार आहेत. असे असले तरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि पर्वती  या परिसरात वंचित आघाडी आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या शिवाय शहरातील काही पेठा आणि वस्त्यांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असल्याने शहरात परिवर्तन करण्याची संधी वंचित आघाडीला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत बोलून दाखवली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना लोकसभा निवडणुकीत ६४ हजार ७९३ मते मिळाली आहेत. त्यातही वडगावशेरी भागातून तब्बल २१ हजार ८४ मते जादव यांना मिळाली आहेत. त्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून ११,३७६, पर्वती १०,६३४ आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधे १४,६९९ मते वंचितला मिळाली आहेत. कोथरुडमधे ४,४७० आणि कसब्यातून २ हजार ४७१ मते वंचितला मिळाली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक