शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

बॅडमिंटन स्पर्धा : अनन्या, महेश, नुपूर, मानसी यांना दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:24 AM

अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.

पुणे : अनन्या गाडगीळ, महेश उतगिकर, नुपूर सहस्त्रबुद्धे, मानसी गाडगीळ, समीर भागवत, हर्षद भागवत यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.पीवायसी हिंदू जिमखाना येथिल बॅडमिंटन कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत दुसरी मानांकित अनन्याने आंचल जैनवर २१-१९, २१-११ गुणांनी मात केली. त्यानंतर अनन्याने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील अंतिम फेरीत चौथ्या मानांकित रिद्धी पुडकेवर २१-१४, २१-१४ गुणांनी २९ मिनिटांत विजय मिळवला विजेतेपदासह दुहेरी यश मिळवले. अनन्या हि अरण्येश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकते. नीता केळकर यांच्याकडे ती बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.महेश उतगिकरने ४० वर्षांखालील पुरुष दुहेरी आणि ४० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. स्पर्धेतील ४० वर्षांखालील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत महेश-अमित देवधर या अग्रमानांकित जोडीने महेश कुलकर्णी-विक्रांत पाटील या जोडीवर २१-९, २१-८अशी मात केली. यानंतर मिश्र दुहेरीत महेश उतगिकर-चैत्राली नव्हरे जोडीने अर्जुन भगत-प्रेरणा जोशी जोडीवर २१-५, २१-१५ असा विजय मिळवला. नुपूर सहस्त्रबुद्धेने महिला दुहेरी आणि ३० वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले.महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूर सहस्त्रबुद्धे-मानसी गाडगीळ या अग्रमानांकित जोडीने आदिती काळे- रिया जाईल या दुसऱ्या मानांकित जोडीवर २१-१८, २१-१४ असा विजय मिळवला. यानंतर मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत नुपूरने समीर भागवत यांच्या साथीने केदार नागमोडे-दीप्ती सरदेसाई जोडीवर २१-११, २१-९ अशी मात केली. मानसी गाडगीळने महिला दुहेरीच्यापाठोपाठ मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. तिने मिश्र दुहेरीच्या समीर भागवतसह खेळताना अजित कुंभार-रिया जाईल जोडीवर २१-१८, २१-१५ अशी मात केली.हर्षद भागवतने ३० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. ३० वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चौथ्या मानांकित हर्षद भागवतने जयंत पारखीवर २१-१४, २१-९ अशी मात केली. यानंतर दुहेरीच्या अंतिम फेरीत हर्षद भागवत-अजित उमराणी जोडीने केदार नाडगोंडे-तेजस किंजवडेकर जोडीवर २१-८, २१-१० अशी मात केली.

टॅग्स :BadmintonBadmintonPuneपुणे