'बडे मिय्या छोटे मिय्या' पासून डॅनी पंडितची खरी सुरुवात; अभिनयानं बनवलं डिजिटल क्रिएटर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 02:37 PM2023-01-01T14:37:20+5:302023-01-01T14:37:57+5:30

इन्स्टाग्रामचा फायदा कल्पकपणे केला तर डिजिटल क्रिएटर बनणं प्रत्येक कलाकाराला शक्य होईल

Bade Miyya Chhote Miyya Danny Pandit True Beginning Digital creator made by acting | 'बडे मिय्या छोटे मिय्या' पासून डॅनी पंडितची खरी सुरुवात; अभिनयानं बनवलं डिजिटल क्रिएटर

'बडे मिय्या छोटे मिय्या' पासून डॅनी पंडितची खरी सुरुवात; अभिनयानं बनवलं डिजिटल क्रिएटर

googlenewsNext

मानसी जोशी

पुणे : इन्स्टाग्रामचे फॅड सध्या सगळ्याच तरुणांमध्ये आहे. इन्स्टाग्राम रिल्स पाहण्यात, तर तरुण मुले तासनतास वेळ घालवितात. याच इन्स्टाग्रामचा फायदा कल्पकपणे केला तर डिजिटल क्रिएटर बनणं प्रत्येक कलाकाराला शक्य आहे. अशीच काहीशी कहाणी आहे आपल्या आवडत्या डॅनी पंडितची.

‘चाय इज बेटर’ असे असलेला साइन बोर्ड ‘स्टारबक्स’च्या बाहेर घेऊन उभा राहून पहिले रील बनविलेला हा डॅनी आज पुण्यातला अतिशय प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर आहे. सॉर्ट कॅट्स पाहून बालपणीच या अभिनयाची सुरुवात झाली. भाऊ आणि मी मिळून बडे मिय्या छोटे मिय्या वगैरे करायला लागलो. मग पुढे असेच एंटरटेनिंग करावेसे वाटले, असे ताे म्हणाला.

माझे एलएल.बी. आणि सीएस (कंपनी सेक्रेटरी) यात शिक्षण झालेले आहे. सध्या मी इन्स्टाग्राम कंटेंटवरच लक्ष केंद्रित केले आहे. यातच अजून काही आणि किती वेगळे करता येईल यावर माझे लक्ष आहे. कंटेंट बनविणं आणि तो मांडणं यासाठी सबकॉन्शिअस माईंडमध्ये काही कल्पना असतात. ज्या निरीक्षणातून येतात आणि मग त्यावरच रिल्स बनविले जाते. मुळात जेव्हा एखादा कंटेंट टाकला जातो त्याला लोक किती लाईक करतात हे टाकल्यावरच कळले. मी अगदी असेच केले जे ट्रेंड सध्या सुरू आहेत ते डोक्यात ठेवून कंटेन्ट बनवत गेलो मग मला लाखोच्या संख्येने व्हियूज आणि लाईक्स मिळाले, असे ताे म्हणाला.

दीड वर्षाखाली सुरू झालेला हा प्रवास ज्याने मला खूप काही शिकविले. घरच्यांचा मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. तसेच खूप नवनवीन लोकांना भेटलो आणि अनेक सेलिब्रिटी सोबत भेटायला मिळाले. वैयक्तिक माझ्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे डिव्हाइनच्या टीमने मला बोलविले होते. आपल्याला कधी एवढे यश मिळू शकते असा विचारही केला नव्हता. इतरांपेक्षा काही वेगळे करीत असताना मॉरल सपोर्ट खूप गरजेचा असतो आणि तो मला वेळोवेळी अथर्व, निरंजन, समीर, पवन या माझा खास मित्रांनी मला नेहमीच दिला आहे.

एक इन्स्पिरेशन आपण आयुष्यात ठेवले तर आपण जग जिंकू शकतो असे मला वाटते आणि माझे हेच इन्स्पिरेशन लोगान पॉल आहे. याला डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच गोष्टी मी मिळविल्या. तरुण पिढीनेदेखील असे करावे. कंटेंट क्रिएट करताना इतरांपेक्षा आपण काय वेगळे देऊ शकते हे पाहावे. सोशल मीडिया अशक्य गोष्टी ही शक्य करू शकतो. यातूनच घरबसल्या तुम्हाला पैसा मिळू शकतो, मात्र ट्रेंडला धरून आणि योग्य त्या कल्पकतेचा वापर करून तुम्हीसुद्धा तुमच्या आत असलेल्या कलाकाराला जागं करू शकता, असे डॅनी पंडितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Bade Miyya Chhote Miyya Danny Pandit True Beginning Digital creator made by acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.