अघोरी कृत्य! इंदापूरात शेतात आढळले नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळद - कुंकू; शेतकरी कुटुंब भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:25 PM2022-01-27T18:25:42+5:302022-01-27T18:31:11+5:30

अघोरी पुजेच्या कृृत्यामळे फीर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत

bad type of material faund in the field in indapur | अघोरी कृत्य! इंदापूरात शेतात आढळले नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळद - कुंकू; शेतकरी कुटुंब भयभीत

अघोरी कृत्य! इंदापूरात शेतात आढळले नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळद - कुंकू; शेतकरी कुटुंब भयभीत

googlenewsNext

बाभूळगाव(ता.इंदापूर) : गलांडवाडी नं.२(ता.इंदापूर) हद्दीतील शिंदे वस्तीववरील शेतकर्‍याच्या शेतात अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी जादुटोना व अघोरी कृृत्य करण्यात आले होते. शेतकरी कटुंबाला भयभित करण्यासाठी कृृत्य करण्यात येत असल्याबाबतची फिर्याद अज्ञात इसमाविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हणुमंत माणिक शिंदे.(वय ५८, रा.शिंदे वस्ती, गलांडवाडी नं.२,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दिली आहे. फीर्यादी हे १४ जानेवारी रोजी सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या मालकीच्या शेतात नारळ, टाचण्या,टोचलेले लिंबू, गांधी टोपी, बागायतदार, नैवद्य, अंडी, हळदी कुंकु, कापूर, अगरबत्ती, असे सर्व अघोरी कृृत्य केलेले साहित्य आढळून आले. तर यापुर्वीही अनेकदा असे अघोरी पुजेचे प्रकार घडले असल्याचे घरातील नातेवाईक महिलांनी सांगितले.

कुटुंबातील सर्वजण दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत

या अघोरी पुजेच्या कृृत्यामळे फीर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. फिर्यादीने शेत पिकवु नये तसेच त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे. घरातील व्यक्तिंचा घात पात मृत्यू व्हावा व दूखापत घडवून आणण्याच्या उद्देशाने फीर्यादीच्या कुटुंबीयांच्या मनामध्ये भिती व दहशत निर्माण करून शेतात नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोणा करून वारंवार अशा प्रकारचे अघोरी कृत्य घडत असल्याने फीर्यादीचे नमूद केले आहे. सदर प्रकरणाचा तपास होऊन आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दिल्याचे म्हटले आहे.

Web Title: bad type of material faund in the field in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.