शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान
3
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
4
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
5
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
6
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
8
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
9
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
10
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
11
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
12
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
13
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
14
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
15
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
16
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
17
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
18
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
19
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
20
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका

तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून पडून चिमुरडीचा मृत्यू; कोथरूडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 5:16 PM

खाली वाकून पाहत असताना अचानक तोल गेल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली. 

ठळक मुद्देयाप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पुणे: इमारतीखाली भाजी आणण्यासाठी गेलेल्या आईला खाली वाकून पाहत असताना गॅलरीतून तोल जाऊन तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत घडली.  अविष्का ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

   याप्रकरणी कोथरूडपोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातत आली आहे. अविष्का विशाळ कोळपकर (वय तीन वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वृंदावन पार्कमधील महात्मा सोयायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोळपकर कुटुंबीय राहतात. त्यांना तीन वर्षांची मुलगी अविष्का होती. रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अविष्काच्या आईला भाजी आणण्यासाठी खाली जायचे होते. त्यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे त्यांनी तिला घरातच थांबण्यास सांगितले. खाली जाऊन येत असल्याचे सांगितले. त्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून खाली गेल्या. काही वेळानंतर अविष्का आई आली का हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली पहात असताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली.  त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

....

 

टॅग्स :kothrudकोथरूडDeathमृत्यूPoliceपोलिस