’नर्मदेऽऽ हर हर’ पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांचे पुण्यात निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 08:58 PM2021-03-04T20:58:06+5:302021-03-04T20:59:01+5:30

जगन्नाथ केशव कुंटे ऊर्फ अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत...

Author Jagannath Kunte passed away in Pune | ’नर्मदेऽऽ हर हर’ पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांचे पुण्यात निधन 

’नर्मदेऽऽ हर हर’ पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांचे पुण्यात निधन 

googlenewsNext

पुणे : चार वेळा नर्मदा परिक्रमा केलेले लेखक जगन्नाथ केशव कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. कवी कृष्णमेघ कुंटे आणि संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांचे ते वडील होत. गुरुवारी सायंकाळी वैकुंठ समशानभूमीत कुंटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगन्नाथ केशव कुंटे ऊर्फ अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. इ.स.२०१० सालापर्यंत त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली. परिक्रमांच्या अनुभवांवर आधारलेली ’नर्मदेऽऽ हर हर’ आणि ’साधनामस्त’ ही दोन पुस्तके कुंटे यांनी लिहिली. त्यांची पाचही पुस्तके पुण्याच्या ’प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत.

जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके    :

कालिंदी
धुनी 
नर्मदेऽऽ हर हर
नित्य निरंजन 
साधनामस्त 
प्रकाशपुत्र

Web Title: Author Jagannath Kunte passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे