जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक फुलांची आरास; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेपठार गणपुजा साध्या पद्धतीने साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:45 IST2021-07-11T16:45:49+5:302021-07-11T16:45:57+5:30
जेजुरीत दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा गणपुजा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने निवडक पुजारी, मानकरी वर्गाच्या उपस्थित साजरा करण्यात आला

जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक फुलांची आरास; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेपठार गणपुजा साध्या पद्धतीने साजरी
जेजुरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या यात्रा उत्सवांस बंदी असल्याने जेजुरीत दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा गणपुजा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने निवडक पुजारी, मानकरी वर्गाच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी खंडेरायाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
जेजुरीतील वाणी समाज, रामोशी समाज आणि पुजारी समाजातील मानकऱ्यांनी ह्या उत्सवाचे नियोजन केले होते. काल शनिवारी सकाळी व दुपारची महापूजा वाणी समाजातील निवडक लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. तर रात्री ९ वाजता रामोशी समाजाने पूजा केली.
यानंतर वाणी समाजाने मानाचा भंडारा वाहिला देवाचा छाबिना, आरती गुरव समाज, छबिना वादन घडशी, विर समाज व दिवटी बुधलीच्या उजेडात उत्सवमूर्तींना मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनेनंतर उत्सवमूर्ती मंदिरात पुन्हा आणण्यात आल्या. यानंतर भंडारा वाटप करण्यात आले. गणपूजा कार्यक्रमाचे संयोजन कडेपठार ट्रस्टने केले होते. यावेळी जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.