घरफोडी, लूटमारीचे गुन्हे करून फरार झालेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चाकू अन् ब्लेडने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:33 IST2021-05-15T21:30:15+5:302021-05-15T21:33:28+5:30
गाडी स्लिप झाल्याने लागला हाती......

घरफोडी, लूटमारीचे गुन्हे करून फरार झालेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चाकू अन् ब्लेडने वार
पुणे : घरफोडी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला चोरटा गाडी स्लिप झाल्याने पोलिसांच्या टप्प्यात आला. आपल्याला पकडून नये, म्हणून त्याने ब्लेड आणि चाकूने स्वत:वर शस्त्रांनी वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
बबलूसिंग प्रभूसिंग टाक (वय ३०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया चोरट्याचे नाव आहे. पोलीस नाईक अमित साळुंखे यांनी या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टाकविरोधात घरफोडी, लूटमार असे गुन्हे दाखल आहेत. तो ऊरळी देवाची परिसरात राहत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी घराजवळ सापळा लावला. पोलीस असल्याची कुणकुण लागल्याने टाक अंधारात पसार झाला. दुचाकीवरून पसार झालेल्या टाकला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरू केला.
काही अंतरावर त्याची दुचाकी घसरली. टाकने त्याच्याकडील चाकू तसेच ब्लेडने स्वत:वर वार केले. जखमी अवस्थेतील टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.