शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न; नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 5:49 PM

हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात वेटरला अटक...

पुणे : सराईत गुन्हेगार असल्याने आपली ओळख पटू नये, म्हणून त्याने मोटारसायकलच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड केली. ओळख पटू नये, म्हणून त्याने तोंडाला रुमाल बांधला, डोक्यावर टोपी घातली, तरीही चिकाटीने तपास करुन पोलीस ७२ तासाच्या आत या सराईत गुन्हेगारापर्यंत पोहचले. शिवाजीनगर पोलिसांनी बालाजी शंकर बनसोडे (वय ३६, सध्या रा. हॉटेल राजलक्ष्मी, कर्वेनगर, मुळ रा. सोलापूर) याला अटक केली. बनसोडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, मारहाणीचे गुन्हे सोलापूर पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत.

हेमंत कणसे (वय ३५) यांचे शिवाजीनगर येथील शिवाजी पुलाखाली स्वामी समर्थ ज्युस सेंटर आहे. गेल्या बुधवारी सकाळी कणसे ज्युस सेंटरवर असताना एक जण आला. त्याने लोखंडी हातोड्याने कणसे यांच्या डोक्यात, कानाजवळ, डोक्याच्या पाठीमागे एका मागोमाग एक असे तीन वार केले. त्यांना वाचविण्यासाठी कामगार दीपक सोळंके धावले असताना हल्लेखोराने त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर हातोड्याने मारुन जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेला.

या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त मोटारसायकलचा नंबर हाच काय तो पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याआधारे तपास करत असताना त्यांना तिच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले. सहायक निरीक्षक अहिवळे व त्यांच्या सहकार्यांना तांत्रिक विश्लेषणात नंबरप्लेटमधील ४ हा आकडा दोनदा होता, परंतु त्यावर चिकटटेप लावून तो १ केला असल्याचे आढळून आले. मुळ नंबर मिळाल्याने त्यावरुन पोलिसांनी शोध सुरु केला. आरोपी हा कर्वेनगर येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनसोडे याला पकडले.

बनसोडे हा काम शोधण्यासाठी पुण्यात आला होता. शिवाजीनगर येथील एका दुकानाबाहेर तो दिवसभर बसत असे. त्यातून त्याला हेमंत कणसे हे काही वेळा बोलले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. या कारणावरुन बनसोडे याने कणसे यांच्यावर हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केला होता.

५ जणांना विकली होती मोटारसायकल-या गुन्ह्यात मोटारसायकलचा नंबर व तोही खाडाखोड केलेला इतकाच पुरावा होता. त्यावरुन पोलिसांनी मोटारसायकलचा मुळ नंबर शोधून काढला. तिचा मालक शोधत असताना ते मालकापर्यंत पोहचल्यावर त्यांनी आपण ही मोटारसायकल दुसऱ्याला विकल्याचे सांगितले. दुसऱ्याला गाठल्याने त्याने तिसऱ्याला विकल्याचे सांगितले. अशाप्रकारे चार जणांकडून विकली गेलेली मोटारसायकल बनसोडेने वापरली होती. तरीही पोलिसांनी सर्वांचा शोध घेऊन शेवटी बनसोडेपर्यंत पाेहचलेच.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, अंमलदार अतुल साठे, प्रविण राजपूत, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, भालचंद्र बोरकर, कांतीलाल गुंड, शरद राऊत व पालके यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड