कामावरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST2021-07-21T04:10:22+5:302021-07-21T04:10:22+5:30

पुणेः कामावरून झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी नरेंद्र दिनेश कुमार (वय ...

Attempted murder from a dispute over work | कामावरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न

कामावरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न

पुणेः कामावरून झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी नरेंद्र दिनेश कुमार (वय २०, रा. गुजरवाडी कात्रज) याला अटक केली. ही घटना गुजरवाडी येथील जाधव एन्टरप्रायझेस या कारखान्यात शुक्रवारी दुपारी घडली आहे. संजय कुमार रजक (वय २५, रा. गुजरवाडी) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी कारखान्याचे मालक विठ्ठल जाधव (वय ५१, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेंद्र कुमार याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र कुमार व संजय रजक हे दोघे फिर्यादी जाधव यांच्या कारखान्यात काम करतात. शुक्रवारी दुपारी दोघांच्यात कामावरून वाद झाला. त्या वेळी नरेंद्र कुमार याने संजय रजक याच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून गंभीर जखमी करत खुनाचा प्रयत्न केला.

Web Title: Attempted murder from a dispute over work